YouTube Video Carousel

जे ए टी महिला महाविद्यालयात वन्यजीव सुरक्षा सप्ताह निमित्त श्री अमित खरे यांचे व्याख्यान

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा  विकास समिती, इंग्रजी विभाग आणि प्राणी शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता संवर्धनाबाबत   जागरूकता निर्माण करण्यासाठी मालेगावातील सुप्रसिद्ध वन्यजीव रक्षक श्री अमित खरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जतन करणे किती आवश्यक आहे हे श्री अमित खरे यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. 
 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी काय करणे आवश्यक आहे  याबाबत विस्तृत आणि महत्त्वपूर्ण माहिती श्री अमित खरे यांनी  दिली. हिंस्र प्राण्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात भीती असते त्याचप्रमाणे कुतूहल देखील असते.  विद्यार्थिनी मधील असलेले कुतूहल जाणून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात श्री अमित खरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती विविध चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते . प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांची होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर  (इंग्रजी विभाग प्रमुख आणि मन्वयक महिला  सुरक्षा आणि विकास समिती) यांनी केले  कु. सबाहतुन्निसा हिने सूत्रसंचालन केले. डॉ. मोहम्मद इस्माईल मोहम्मद इब्राहिम यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानासाठी बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु आफिया, कु हुस्ना, कु उम्मे अम्मारा इ. नी महत्त्वपूर्ण योगदान दिले


Previous Post Next Post