YouTube Video Carousel

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गावठी दारू हातभट्ट्यांवर मोठी कारवाई, २५ गुन्हे दाखल, २५ जणांना अटक

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्ट्यांवर आज रोजी ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजन करण्यात आले होते.
या कारवाईत जिल्हयातील मालेगाव तालुका, सटाणा व अभोणा मधील ४, इगतपुरी व जायखेडा मधील प्रत्येकी २, वाडीव-हे मधील र तरकेश्वर, सुरगाणा, कळवण, नांदगाव, छोटी मधील प्रत्येकी १ ठिकाणांचा समावेश आहे. यात जिल्हयातील डोंगर-द-या, नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापे टाकून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची गावठी दारू जप्त केली आहे.
सदर धाडसत्रात सर्वात जास्त माल घोटी पोलीस ठाणेच्या हद्दीतील मोराच्या डोंगराच्या पायथाशी उमराई माथा परिसरात मिळून आला. सदर ठिकाणी विशेष पथकाने छापा टाकून, त्याठिकाणाहून २०० लिटरचे ४७ प्लॅस्टिक ड्रम व त्यातील एकूण २४०० लिटर नवसागर व गुळ मिश्रीत रसायन, काळया गुळाची पावडर असलेल्या १७ गोण्या, १४ गुळाच्या भेल्या ५ किलो नवसागर असा एकूण ४,९२,६००/- रु. किंमतीना मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाईत अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांचेसह ०५ पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ३५ सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व सुमारे ४०० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
या कारवाईत २५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर हेल्पलाईन सुरु केली असून, नागरिकांनी ६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
सुमारे ८,०९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
२५ जणांना अटक करण्यात आली.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली २५ गुन्हे दाखल करण्यात आले.


जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे.
गावठी दारू हा एक धोकादायक पदार्थ आहे.
गावठी दारूमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.


हेल्पलाईन
नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर हेल्पलाईन सुरु केली आहे.
६२६२ २५६३६३ या हेल्पलाइनवर संपर्क साधून अवैध व्यवसायांची माहिती देऊ शकता.
Previous Post Next Post