YouTube Video Carousel

कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे उद्योजकता जागृती या विषयावर कार्यशाळा संपन्न!!

रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे वाणिज्य विभागाच्या वतीने उद्योजकता जागृती या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र बी. गोसावी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश दादाजी वाघ हे तर या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून मा. श्री सचिन अहिरे मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय करंजाळ हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रस्ताविक प्रा. गीतांजली खैरनार यांनी, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मोहिनी निकम यांनी तर या कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. सारिका सोनवणे यांनी केले.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, श्री सचिन अहिरे, आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्याला आवडणारे क्षेत्र निवडून त्यात योग्य ती गुंतवणूक करून वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर उद्योग-व्यवसायात निश्चीतच चांगले यश मिळवता येते असे सांगून, शासनाच्या वितीने नव उद्योजकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
        या वेळी महाविद्यालयाचे कला, शाखेचे प्रमुख प्रा. भरत आहेर मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून, शेती क्षेत्रात नव-नव्या तंत्रज्ञांचा वापर करून योग्य पद्धतीने नियोजन केले तर शेती शेत्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी आहेत असे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
           यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र गोसावी म्हणाले की, आजच्या तरुणांनी रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे हवे असे सांगून उद्योग- धंदे असेल अथवा कृषी क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रास शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध अनुदानाची व योजनांची माहिती दिली.
         या कार्यक्रमास महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. नितीन शेवाळे, प्रा. भरत आहेर, प्रा. निलेश देवरे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. प्रांजल पवार, प्रा.जिंकल पटेल, प्रा. सोनम पाटील, प्रा. रुची देवरे, प्रा. नेहा गांगुर्डे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post