YouTube Video Carousel

कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणिकरण होत नसल्याची तक्रार नोंद पावती धारकांनीच तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा:तहसिलदार

*मालेगाव, दि. 25 (मालेगाव लाईव्ह)* :-  सहकार विभागामार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नाही, तसेच आधार प्रमाणिकरण होत नसल्याची तक्रार नोंद पावती आहे. अशा शेतकऱ्यांनीच आपले आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र घेऊन तहसिल कार्यालयाकडे समक्ष पडताळणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

आजपावेतो 18 हजार 27 अपलोड केलेली कर्ज खाती असून यापैकी 14 हजार 542 खात्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे. तर 2 हजार 240 खात्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहेत. तहसिल कार्यालयाकडे आजपावेतो 140 खात्यांचे तक्रार निवारण करण्यात आले असून 117 खाते तक्रार निवारणासाठी प्रलंबित असल्याचेही त्यांनी कळविले आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होत नसून ज्यांच्याकडे तशी तक्रार नोंद पावती आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची तहसिल कार्यालयातून तक्रार निवारण करून घेण्याचेही तहसिलदार श्री.राजपूत यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post