मालेगांव, 10 ऑक्टोबर 2023: मालेगांव शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याची तयारी करत असलेला सराईत गुन्हेगार शेख रब्बानी शेख कादीर (वय 32) पवारवाडी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्यासह इतर दोन आरोपी देखील पकडण्यात आले आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री शहाजी उमाप, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, मालेगांव शहर उपविभागीय अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांना दिनांक 09/10/2023 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार 5 इसम हे पायी पायी फिरून लोकांना अडवुन शस्त्राचा धाक दाखवुन मोबाईल व पैसे लुटत आहे व ते आता मुंबई आग्रा हायवेवर लब्बेक हॉटेल जवळ लोकांना लुटण्यासाठी गेलेले आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुधिर पाटील, पो. हवा. राकेश उबाळे, निलेश निकम, संतोष सांगळे, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार असे पथक तयार करून सदर ठिकाणी कारवाईकामी पंचासह मुंबई आग्रा महामार्गावर लब्बेक हॉटेल जवळ जात असताना सदर इसमांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळु लागले त्यांचा पाठलाग करून त्यातील तीन इसम यांना पकडले त्या इसमांमध्ये मालेगांव शहरातील पोलीस स्टेशनला गुन्हयात फरार आरोपी शेख रब्बानी शेख कादीर वय 32 वर्षे राह-बफातीपुरा मालेगांव हा मिळुन आला.
पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी शेख रब्बानी शेख कादीर हा मालेगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२२, गु.र.नं. ११९ / २०२२, गु.र.नं. २४९/२०२२, गु.र.नं. २५१ / २०२२, गु.र.नं. २६९ / २०२२, तसेच मालेगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७६ / २०२२, तसेच जळगांव जिल्हा कासोदा पोलीस स्टेशन गु.र.नं. २२ / २०२३ मध्ये फरार होता.
पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 2 देशी गावठी बंदूक, 6 जिवंत काडतुस, 1 धारदार तलवार असे एकूण 51,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी सांगितले की, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 24 तासांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.