मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप चे भूमिपुत्र शहीद सचिन विक्रम मोरे यांना त्यांच्या मूळ गावी प्राथमिक शाळेच्या पटांगणात साश्रूनयनांनी देण्यात आला.
वीर जवान सचिन मोरे जम्मू-काश्मीरच्या गलवान खोऱ्यामध्ये सहकार्यांचे जीव वाचवताना शहीद झाले काल त्यांचे पार्थिव पुण्याला आणण्यात आले त्यानंतर तेथून त्यांच्या मूळ गावी मोरेवस्ती, साकुरी तालुका मालेगाव येथे आणण्यात आले, आज दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी त्यांच्या चिमुकल्या आठ महिन्यांच्या बाळाने त्यांच्या चितेला अग्नी दिला..

