YouTube Video Carousel

पुणे विद्यापीठात पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह लिखाण; भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

पुणे, 03 नोव्हेंबर 2023: पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले होते. या घटनेचा भाजप युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे.भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी एसएफआयचे कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला होता. तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.या निषेध आंदोलनादरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. तसेच, विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. तसेच, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात राजकीय वातावरण तापले आहे
Previous Post Next Post