YouTube Video Carousel

नाशिकमधील प्रसिद्ध बिल्डर नरेश कारडा यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक, भावाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

नाशिक, २ नोव्हेंबर २०२३ - नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी गुरुवारी (ता.२) दुपारी धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केली.

दोन दिवसांपूर्वीच आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेले नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज रेल्वे गाडीखाली येत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून मनोहर कारडा यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला? त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

एक कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. नाशिक शहरातील नामांकित बिल्डर म्हणून कारडा कन्स्ट्रक्शनची ओळख आहे. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात न केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात आणखी १५ तक्रार अर्ज आले. त्या अर्जामध्ये कारडा व त्यांच्या भावांचे नावे होती.

मनोहर कारडा यांचे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या व्यथित झाले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


Previous Post Next Post