YouTube Video Carousel

देवपुरपाडे येथील कै. देवराम सदा पाटील सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अरुण दादा अहिरे तर व्हा. चेअरमन पदी सौ सुमनबाई अहिरे यांची बिनविरोध निवड

देवळा प्रतिनिधी : आढाव सर

देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथील कै. देवराम सदा पाटील सहकारी सोसायटीचे मावळते चेअरमन श्री. अभिमन बापू अहिरे व व्हा. चेअरमन सौ. यशोदाबाई केदा आढाव यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते म्हणून रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक अधिकारी श्री. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी एकेक अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गवळी यांनी चेअरमनपदी अरुण अहिरे तर व्हा. चेअरमन पदी सौ. सुमनबाई रमेश अहिरे निवड झाल्याचे घोषित केले.

         चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा मा. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी चेअरमन व व्हा. चेअरमन यांना फोन वरून शुभेच्छा दिल्या.

              यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा निवडणूक अधिकारी गवळी व संचालक मंडळाने सत्कार केला. तसेच निवडणूक अधिकारी गवळी यांचा सत्कार  अभिमन अहिरे यांनी  केला,  नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.

यावेळी मावळते चेअरमन अभिमन अहिरे, व्हा. चेअरमन सौ. यशोदाबाई केदा आढाव, भास्कर ठाकरे, भागा आढाव, सुशिला अभिमन आहिरे, राजाराम पवार, वसंत  अहिरे, अजय  आहिरे, सचिव शिंदे , केदा आढाव, मधुकर ठाकरे, राम अहिरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post