YouTube Video Carousel

डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या सहकार्याने नीट (NEET) क्लासेस

माजी विशेष पोलीस महानिरीक्षक, तथा एमपीएससी सदस्य डॉ. प्रतापराव दिघावकर यांची भाजपाच्या नमो चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच  निवड झाली आहे, त्यांच्या या निवडीचे मालेगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिघावकर यांनी मालेगाव जवळील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. डॉ. दिघावकर यांनी विद्यार्थ्यांसाठी नीट क्लॉसेस उपलब्ध करुन दिले. जनसेवा फाउंडेशन  च्या संकल्पनेतून संस्थापक भगवान ठाकरे यांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी होस्टेलचे अधिक्षक खैरनार, राहुल पवार,जितेंद्र माउली, जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाठ आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. दिघावकर यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान यांनी केले. राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Previous Post Next Post