YouTube Video Carousel

श्रीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान

प्रतिनिधी | देवळा 
    श्रीरामपुर ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक तास (दि.१) रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसर व गावात राममंदिर चौक आदी ठिकाणी स्वच्छता श्रमदान करून पंचायत समिती आधिकारी गोपाळ इंगळे ,ग्रामविकास अधिकारी सरपंच ,उपसरपंच,सदस्य ,ग्रामस्थ यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले .
    ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे सरपंच लिलाबाई पवार व उपसरपंच ,सदस्य यांच्या हस्ते पूजन करून स्वच्छता श्रमदासाठी लोकप्रतिनिधी ,आधिकारी ,कर्मचारी ,शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी ,महिला बचत गट ,ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गावातील राममंदिर चौक तसेच परिसर व ग्रामपंचायत परिसर स्वच्छता करण्यात आली आहे.
याप्रसंगी गावातील दोन सफाई कामगार यांचा सरपंच लिलाबाई पवार यांच्या हस्ते अरुणा आहिरराव व शितल निकम यांचा सत्कार करून ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 
यावेळी उपसरपंच प्रशांत निकम ,सदस्य जगदिश निकम , वैशाली सावंत ,नाना सावंत ,जनार्दन पगार ,संदीप निकम ,रवींद्र निकम,जयश्री पगार ,रेखा कोठावदे ,निर्मला निकम ,वंदना लोखंडे ,आश्विनी थोरात , रेखा भदाणे ,मंदाकिनी निकम ,कल्पना निकम ,सुनीता आहिरराव ,शोभा निकम ,सरिता निकम आदी उपस्थित होते.
  ग्रामसेविका अर्चना सोनार यांनी प्रस्ताविक करून स्वच्छतेची सामूहिक शपथ देण्यात आली व आभार शिक्षक जनार्दन पगार यांनी मानले.
Previous Post Next Post