YouTube Video Carousel

प्राचार्य डॉ. दिनेश पाटील यांना पी.एच.डी.

मालेगांव : इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी फार्मसी) मालेगाव कॅम्प येथील प्राचार्य डॉ. दिनेश पाटील यांना जे जे टी युनिव्हर्सिटी (राजस्थान) येथून फार्मासुटीक्स विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. पाटील यांनी "क्वालिटी बाय डिझाईन बेस डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सड्रमल डिलिव्हरी सिस्टीम युजिंग नॅचरल पॉलिमर" या विषयावर संशोधन करून पीएचडी मिळवली आहे. या संशोधनात त्यांनी नैसर्गिक पॉलिमरचा वापर करून ट्रान्सड्रमल डिलिव्हरी सिस्टम विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रणाली औषधांचे थेट त्वचेतून शोषण होते, ज्यामुळे औषधाचे जास्तीत जास्त शोषण होते आणि त्याचे दुष्परिणाम कमी होतात.

डॉ. पाटील हे शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण व सातत्याने कामगिरी करीत असतात. त्यांना प्राचार्य डॉ. राशीद सर रॉयल कॉलेज ऑफ फार्मसी, सायने खु. यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.

डॉ. पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल संस्थेचे सहसचिव डॉ.अद्वयआबा हिरे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे समन्वयक माजी आमदार डॉ.अपूर्वभाऊ हिरे सीडीसी व्हा. चेअरमन डॉ. आर के देवरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

डॉ. पाटील यांचे संक्षिप्त परिचय:

जन्म :१९८७, मालेगाव
शिक्षण : डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी (फार्मासुटीक्स)

पदवी : पीएचडी (फार्मासुटीक्स)
अनुभव : १० वर्षे
सध्याचे पद : प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी फार्मसी), मालेगाव कॅम्प
डॉ. पाटील यांचे संशोधनाचे महत्त्व:

नैसर्गिक पॉलिमरचा वापर करून ट्रान्सड्रमल डिलिव्हरी सिस्टम विकसित करणे ही एक नवीन संकल्पना आहे.
ही प्रणाली औषधांचे थेट त्वचेतून शोषण होते, ज्यामुळे औषधाचे जास्तीत जास्त शोषण होते आणि त्याचे दुष्परिणाम कमी होतात.
हे संशोधन औषधनिर्माण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण योगदान आहे.
Previous Post Next Post