YouTube Video Carousel

नाशिक :लाचखोर व्यवसाय कर अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले


नाशिक :(ता. २०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवसाय कर अधिकारी स्नेहल सुनिल ठाकुर यांना लाच घेताना रंगेहात पकडले. लाचखोर अधिकाऱ्याने तक्रारदार कडून व्यवसाय कर रद्द करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी चार हजार रुपये स्वीकारले.

लाचखोर अधिकारी स्नेहल ठाकुर (वय 52) व्यवसाय कर विभागात कार्यरत आहे. तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासून बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी व्यवसाय कर अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता.

व्यवसाय कर रद्द करण्यासाठी लाचखोर स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार कडून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार विभागाने सापळा रचला.

सापळ्यात तक्रारदार यांनी स्नेहल ठाकुर यांना चार हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई 
 श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर- 
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,
श्री माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र, 
श्री नरेंद्र पवार 
वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
यांच्या मार्गदर्शनाखाली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत पांडुरंग जाधव यांनी 
सापळा पथक:                                       
पो.ह .प्रकाश डोंगरे 
पो. ना. प्रणय इंगळे 
म पो शि शितल सूर्यवंशी 
चा ल क पो ह संतोष गांगुर्डे 
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक 
यांच्यासोबत केली

एसीबी कडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.

दुरध्वनी क्रमांक- 
02532578230,टोल फ्री क्रमांक १०६४


Previous Post Next Post