YouTube Video Carousel

'तो' व्हिडीओ मालेगावचा नाही

मालेगाव (जययोगेश पगारे ) सोशल मीडियावर कोण कशाचा संबंध कुठे जोडून मोकळा होईल सांगता येत नाही, आणि त्यातच एक रिकामटेकडी 'मंडळी' कधी फॉरवर्ड करायला मिळेल या शोधात टपलेलीच असतात,
आज असाच एक पेट्रोल पंपावरील पोलीस कारवाईचा व्हिडिओ 'नानावटी' पंपाच्या नावाने खपविण्यात येत आहे, बऱ्यापैकी  पेट्रोल पंपाची रचना व रंगसंगती एकसारखी असते, आणि केवळ दिसायला सारखे असल्याने ती गोष्ट खरी होत नाही, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता केवळ फॉरवर्ड करणे हा एकमेव उद्योग असणाऱ्या  मंडळी समाजात गैरसमज  व संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असतात.
सुज्ञ नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, कुठलाही मेसेज आल्यावर त्याची खात्री न करता फॉरवर्ड करू नये.
 मालेगाव लाईव्ह पडताळनीत सदर व्हिडियो हा मालेगाव येथील नसुन  सांगली येथील असल्याचे सिद्ध झाले आहे..
Previous Post Next Post