YouTube Video Carousel

सतत मास्क वापरल्याने शरीरातील ऑक्सिजन कमी होते, जाणून घ्या व्हायरल मेसेज मधील सत्य

मानवी शरीराला दिवसात 550 लीटर ऑक्सिजनची गरज असते. एरवी ही गरज सहजपणे पूर्ण होते. मात्र, मास्क परिधान केल्यास शरीराला फक्त 250 ते 300 लीटर ऑक्सिजनचाच पुरवठा होतो. तसेच मास्क लावल्याने शरीरातील कार्बनडायऑक्साईडची पातळीही वाढते. त्यामुळे मास्क घालणे धोकादायक ठरु शकते, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हा
 हा व्हायरल मेसेज खोटा आहे त्यात काही तथ्य नाही 
हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट टीमने याची पडताळणी केली. त्यानंतर या गोष्टी काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मास्कचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचा मेसेज फेक आहे. असा कोणताही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही, असे प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे. तर मित्रांनो मास्क वापरा आणि सुरक्षित राहा, आपल्या व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या!
Previous Post Next Post