YouTube Video Carousel

परीक्षांच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नायब तहसीलदार यांना निवेदन.

प्रतिनिधी-दिनेश पगारे(दि.20ऑक्टो):   बागलाण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ना.तहसिलदारांना विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
             कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष करत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या मार्गदर्शक तत्वानुसार शेवटच्या वर्षाच्या परीक्षा सर्व विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थामध्ये घेतल्या गेल्याच पाहिजेत,असा आग्रह सर्वप्रथम केंद्र सरकारने धरत राष्ट्रीय साथीच्या काळात अनावश्यक गुंतागुंत निर्माण केली.हा आग्रह धरून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याची    उठा ठेव करण्यामागे राष्ट्रासमोर उभ्या असलेल्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष व्हावे हा अंत:स्थ हेतू केंद्र सरकारचा आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
         मुळात परीक्षा व्हाव्यात की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्र शासनाला नाही, कारण उच्च शिक्षण हे संविधानाच्या समवर्ती सूची मध्ये आहे. म्हणूनच परीक्षांच्या बाबतीत राज्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे म्हणजे जाणीव पूर्वक केलेला प्रयत्न आहे.                                                                                                            निवेदनात नमूद केल्याप्रमाणे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. केवळ स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने याबाबतीत घातलेले लक्ष , केंद्र सरकारच्या तालावर नाचणारे UGC आणि परीक्षेविषयी विद्यार्थ्यांचे मत विचारात न घेणारे  राज्यपाल, त्याचबरोबर अविचारी आणि नियोजन शून्य कारभार करणारे कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन यांचा आम्ही निषेध करतो व यापुढील सर्व परीक्षा एक तर होम असायनमेंट (HOME ASSIGNENT) पध्दतीने व्हाव्यात किंवा परीक्षा पद्धतीतील सर्व अडचणी पूर्णपणे दूर करून मग त्या घेतल्या जाव्यात  अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत.
     तसेच यापुढेही परीक्षा अश्याच पध्दतीने सुरू ठेवल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बागलाण तालुका धरने आंदोलन करेल. असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला. 
        याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे , जिल्हा पदाधिकारी राजेंद्र सावकार, हॉटेल राज पॅलेस चे संचालक सुमितभाऊ वाघ, सुजित बिरारी,बबलू खैरनार, सागर वाघ , शोएब शेख इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post