आज विजयादशमी दसरा सण आपल्या भारत देशात खूप आनंदात हा सण साजरा केला जातो ह्याच दिवशी आपण रावणदहन ही करत असतो आणि सोन अर्थात आपटेचे झाडाचे पाने एक मेकांना देऊन शुभेच्छा देत असतो ... पण हा सण आनंदाने साजरा करत असताना आपणा कुठ तरी निसर्गाला हानी पोहचवत असतो सोनाच्या रूपाने आपण आपटेचे वृक्ष तोडून त्याचे विक्री करून आपटेचे पाने सोन देऊन शुभेच्छा देत असतो. ह्यात आनेक आपटेंचे वृक्षतोड होतं असते म्हणजेच आपण निसर्ग ला कमी करत असतो आज जगाला निसर्गमुळेच छान जीवन जगता येऊ शकते वृक्ष मुले सर्व जगाला प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळत असतो आणि तो ही मोफत आणि आपण काय करतो निसर्ग कमी करण्यास भर घालत असतो कोरोनाच्या महामारीत वृक्ष आणि निसर्ग च महत्व समजलं आहे म्हणून आज व येणाऱ्या काळात आपण आपटेचे वृक्ष न तोडता एकमकेकांना हात जोडून शुभेच्छा देऊ अशी संकल्पना लोकांनपर्यंत रुजूवण्यासाठी... आज विजयादशमी व दसरा निमित्त निसर्गसेवक रविराज बच्छाव व सौ. कविता बच्छाव ह्या पोलीस दांपत्य यांनी मालेगाव येथे भायगाव शिवार मोकळ्या जागेत वृक्षारोपण व भगवती नगर येते प्रत्येकाला आपटेंचे वृक्ष वाटप करून आपटेंचे वृक्षारोपण केले एक प्रकारे आपटेचे वृक्ष रूपात सोन घ्या अश्या शुभेच्छा दिल्या.. झाडे लावा झाडे जगवा.. निसर्ग वाढवा असा संदेश आपटेचे वृक्ष देऊन व वृक्षारोपण केल्याने बच्छाव पोलीस दांपत्याचा परिसरात कौतुक होतं आहे..आपटेचे वृक्ष देताना लोकांनी निसर्गसेवक रविराज बच्छाव यांचे कौतुक केले व श्री बच्छाव यांनी लोकांना निसर्ग आणि वृक्ष याचे महत्व पटून दिले.
