दिनेश पगारे - केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याची तीव्र प्रतिक्रीया आज सटाणा येथे उमटली. येथे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादी कॅांग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्यासह शेतकरी, कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. स्पष्ट आस्वासन मिळेपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली.
आज काळी सटाणा येथे रास्ता रोको झाला. लासलगाव येथे कांदा लिलाव बंद ठेऊन शेतकरी, व्यापारी बैठक झाली. कळवण, देवळा, चादंवड येथेही त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. नाशिकला स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
सटाणा येथे सकाळी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे श्री. चव्हाण, तालुका अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको केला. गेले महिनाभर कांदा दर कोसळले होते. तेव्हा सतत ओरड सुरु होती. मात्र कोणीही त्याची दखल घेतली नव्हती. शेतकरी संतप्त असतांना भाववाढीसाठीच्या मागणीची काहीही दखल घेतली नव्हती. गेल्या आठवड्यात निर्यातीमुळे दर वधारले होते. अन्य स्पर्धक देशांतील कादा पीकाचे नुकसान झाले. भारतातील अन्य राज्यातही अशीच स्थिती होती. त्या तुलनेत नाशिकच्या शेतक-यांकडे काही प्रामाणात कांदा शिल्लक होता. त्याला किंचीत भाव मिळत होता. मात्र सोमवारी सायंकाळी केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्यातीचे कंटेनर, बागंलादेशसह विविध सीमेवर कांदा ट्रक उभे होते. त्यात बाजारात कांदा विक्रीला आला असतांनाच निर्यातबंदी झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच प्रकार असल्याच्या प्रतिक्रीया या शेतक-यांनी व्यक्त केला आहे.
रास्ता रोकोसह नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहे. त्याची धासीत खासदारांनीही घेतली आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत असल्याच्या बातम्यांनी आजपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे खासदार नवी दिल्लीत आहेत. त्यात खासदार भारती पवार आणि सुभाष भामरे यांनी आज सकाळी केंद्रीय वाणीज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
दरम्यान राज्यातील विविध आमदारांनी कांदा निर्यातबंदीने शेतकरी नाराज आहे. त्याबाबत झालेले नुकसान याविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे श्री. पवार आज दिल्लीत याबाबत संबंधीत मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगतिले.
