YouTube Video Carousel

पो.कॉ.रविराज बच्छाव यांच्यातर्फे वृक्षारोपण व शालेय वस्तू वाटप.

दिनेश पगारे - येथील साई इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये जायखेडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रविराज बच्छाव यांनी स्वखर्चाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली तसेच गरीब व होतकरू वीस विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, शालेय वस्तू व प्रत्येकी एक वृक्ष वाटप केले तसेच लागवड केलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी पुढाकार घेण्याची संकल्पना केली.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, आशा सेविका, साफसफाई कामगार आणि रुग्णांची अहोरात्र रुग्णवाहिकेतून सेवा देणारे चालक काम करीत आहेत. अशातच वेळात वेळ काढून जायखेडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी रविराज बच्छाव यांनी स्वखर्चाने अंबासन येथील साई इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये गरजू व होतकरू वीस विद्यार्थ्यांना स्कुलबॅगा व साहित्य वाटप केले. यावेळी अनेक दिवसांपासून शाळेत न आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंदाने फुलवून गेल्याचे दिसून आले. परिसरात तब्बल शंभर विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून जोपासणा करण्याची संकल्पना हाती घेतली आहे. शालेय मुख्याध्यापक महेंद्र कोर यांनी आपल्या शालेय आवारात विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून घेतली आहेत. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश कोर, आदर्श शिक्षक सुनिल कापडणीस, मनोहर भामरे, आदींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर येथील खंडेराव महाराज डोंगरावरही श्री. बच्छाव यांनी वृक्ष लागवड केली.  



Previous Post Next Post