YouTube Video Carousel

नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह भोपाळला व भोपाळच्या व्यक्तीचा मृतदेह नाशिकला: जिल्हा रुग्णालयाचा प्रताप

नाशिक (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, यावेळी मृतदेह देताना रुग्णालय प्रशासनातर्फे भोपाळच्या व्यक्तीचा मृतदेह नाशिकच्या रुग्णाच्या नातेवाईकांना, नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह भोपाळच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला, नाशिकचे नातेवाईकांच्या ही गोष्ट अंत्यविधीच्या वेळी लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अनंत पवार यांना संपर्क साधून  ही गोष्ट निदर्शनास आणून दिली, परंतु तोपर्यंत भोपाळचे लोक धुळ्यात पोहोचले होते, त्यानंतर दोन्हीकडचे नातेवाईक यांनी एकमेकांशी संपर्क करून चांदवड टोल नाक्यावर मृतदेहांची आदलाबदल करून घेतली, परंतु जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, आधीच दुःखात असलेल्या नातेवाइकांना अशा प्रकारचा त्रास होणे स्वाभाविकच माणुसकीला काळीमा फासणारे आहे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्याच्या गोष्टीची पुनरवृत्ती होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Previous Post Next Post