YouTube Video Carousel

हृदयद्रावक : सॅनिटायझर च्या भडक्याने महिलेचा मृत्यू

नाशिक (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)

     
कोरोना मुळे सध्या सॅनिटायझर हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, नाशकात दिवसेंदिवस वाढणारे कोरोना रुग्ण, आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अशातच घरात सॅनिटायझर मारत असताना अचानक भडका उडाल्याने  वडाळा गावातील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे...
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जुलैला रात्री विज गेलेली असताना घरात मेणबत्ती लावण्यात आली होती आणि त्याच वेळी रजबिया शाहीद शेख (रा. मेहबूब नगर वडाळा गाव) घरात सॅनिटायझर फवारत होत्या, यावेळी अचानक सॅनिटायझरनी पेट घेतला यामध्ये शेख 90 टक्के भाजल्या, त्यांच्यावर नाशकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे...

नागरिकांनी सुरक्षिततेचे उपाय करतानादेखील सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, बहुतांश सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असते व ते ज्वलनशील असते त्यामुळे वाहनावर, घरात किंवा कुठल्याही ठिकाणी जेथे आग लागू शकते अशा ठिकाणी सॅनिटायझर चा फवारा करणे टाळावे...


Previous Post Next Post