YouTube Video Carousel

समाजश्री डॉ.प्रशांतदादा हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रावळगांव उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

रावळगांव (ता. मालेगांव) येथिल योगी रामसुरतकुमार एज्युकेशनल ट्रस्ट संचलित समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ९४ टक्के निकाल लागला. महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली.
यात सायन्स विभागातुन कु. सोनवणे रुपाली रमण हिने ८३.३८ टक्के मिळवत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय क्रमांक जाधव निशा दिलिप ८२.४६ टक्के,  तर अग्रवाल पल्लवी संजय ८१.८५ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला. कला विभागातुन कु. अहिरे निकिता राजेंद्र ७८.७६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तार्ण झाली. द्वितीय क्रमांक कु. रौंदळ किर्ती देवराम ७७.२३ टक्के व कु. शिरुडे आकाश बापु ७६.६१ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला. एकुण हिरे महाविद्यालयातुन सायन्स विभागातुन ८८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते व सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच कला विभागातुन ११७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते त्यापैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अद्वयआबा हिरे - पाटील, सचिव श्री. प्रसाद (लकीदादा) खैरनार, उपाध्यक्ष श्री. अशोक आखाडे सर यांच्यासह सर्व संचालकांनी अभिनंदन केले. परिक्षेसाठी प्राचार्या श्री. अलकाताई आखाडे, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री. आर.पी अहिरे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Previous Post Next Post