*जुनी पेंशन मिळावी, यासाठी शिक्षक भारतीने केलेल्या आंदोलनास नासिक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद*
शासनाने, १० जुलै रोजी काढलेल्या जुन्या पेंशन योजनेच्या संदर्भातील अधिसूचनेस नासिक जिल्ह्यातून प्रखर विरोध ,व शासना च्या ह्या भूमिकेचा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान अद्याप ही न देण्याच्या शासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून आज नासिक जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन नासिक जिल्हा शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांना शिक्षक भारतीच्या वतीने निवेदन देण्यात आले, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग च्या नियमामुळे मोजक्या पदाधिकारी नी हे निवेदन दिले, जिल्हाभरातून मात्र ह्या आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आहे त्या ठिकाणावरून शासनाचा निषेध म्हणून निषेधाचे बोर्ड घेऊन त्याचे फोटो काढून शालेय शिक्षणमंत्र्याना मेल द्वारे ह्या आंदोलनाविषयी कळवण्यात आले आहे अशी माहिती नासिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष के के अहिरे यांनी दिली यावेळी शिक्षकनेते नेते गुलाबराव भामरे, सी बी पवार, गोरख कुनगर, चंद्रशेखर शेलार,सुभाष भामरे, निलेश ठाकूर, बापू शेरेकर, यशवंत ठोके, दिनेश अहिरे, राजेंद्र सोमवंशी, डी एस अहिरे, रामदास गडकरी, सुनील भामरे, ठाकरे, सचिन पगार, आश्रम शाळा शिक्षक नेते,प्र दा पगार, अरुण आहेर,रघुनाथ गायकवाड, शिक्षकेतर नेते संग्राम करंजकर, विनायक लाड इ सह इतर प्रतिनिधी उपस्थित होते ,
यावेळी बोलताना अहिरे म्हटले की जुनी पेंशन योजना व प्रचलित पद्धतीने अनुदान देणे याविषयी शासन आडमुठे पणाचे धोरण अवलंबत असून, चालढकल करत आहे राज्यभरातुन दोन लाखाहून अधिक कर्मचारी जुन्या पेंशन योजनेपासून वंचित राहणार असून प्रसिद्ध केलेली अधिसूचना या कर्मचाऱ्यांना घातक असल्याने ती त्वरित मागे घ्यावी यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन नासिक जिल्ह्यात करण्यात आले असून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचे के के अहिरे यांनी सांगितले.
