केंद्र शासन प्रस्तुत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत मालेगाव शहरातील पथविक्रेत्यासाठी
विशेष सुक्ष्म पत पुरवठा सुविधा देणेकरिता मालेगाव महानगरपालिकेच्या DAY-NULM विभागा मार्फत PM SVANidhi सुविधा व अंमलबजावणी मालेगाव शहरात राबविण्याची नियोजन करण्यात आले. या योजनेत फळे,भाजीपाला, खादये पदार्थ,चहा टपरी, पाणटपरी,केशकर्तनालय,चर्मकार इत्यादी पथविक्रेत्यांसाठी - दुकानासह रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या उपजिवेकेमध्ये कोव्हीड–१९ साथीच्या रोगामुळे परिणाम झाल्यामुळे त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व इतर फायनांस बँका मार्फत सुरू होत आहे. त्यानुसार छोटे व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक यांना राष्ट्रीयकृत बँके कडुन रूपये १०,०००/- पर्यंत खेळते भांडवल कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. नियमित परतफेड व डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हि नवीन संधी उपलब्ध होत आहे. संबंधितांनी विहित कालावधील कर्जाची परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान तीन महिन्याच्या अंतराने मिळणार असून शहरातील सुविधा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने मागणी अर्ज भरता येणार आहे. मालेगाव शहरातील नगरपथविक्रेते / फेरीवाले यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका मालेगाव मार्फ़त करण्यात येत आहे.
