कुकाणे : दिनेश पगारे(दि.29 जुलै)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कुकाणे विद्यालयाचा इ.10 वी चा निकाल जाहिर झाला असुन, विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाचा एकूण निकाल 98.55 टक्के लागला आहे. एकूण विद्यार्थी 70 विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे 32 मध्ये प्रथम श्रेणी मध्ये 29 उर्वरित सर्व विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये यश संपादन केलेले आहे.
विद्यालयाचा एकूण निकाल 98.55 टक्के लागला आहे. एकूण विद्यार्थी 70 विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणारे 32 मध्ये प्रथम श्रेणी मध्ये 29 उर्वरित सर्व विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये यश संपादन केलेले आहे.
गुणानुक्रमे खालील प्रमाणे
1) सूर्यवंशी चंद्रशेखर शामराव 88 .88% प्रथम
2) जाधव वैभव संजय 88 ,40 %द्वितीय
3)जाधव संचीता प्रभाकर 88 .20% तृतीय
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री पोपटराव(नानासाहेब) लोंढे तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र लोंढे सर यांनी अभिनंदन केले आहे.