YouTube Video Carousel

नाशिक जिल्हा कोरोना अपडेट

*पॉझिट्व्ह अपडेट्स: रात्री. ८:०० वाजता*   

*जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ३४०  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;*
*सद्यस्थितीत १ हजार ५३६  रुग्णांवर उपचार सुरू*
*नाशिक, दि. ३० जून, २०२० (जिमाका वृत्तसेवा) :*

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ३४०  कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण पुर्णपणे बरे होण्याची टक्केवारी ५६.८८ इतकी आहे. सद्यस्थितीत १ हजार ५३६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक जिल्हा रूग्णालय ७८ , नाशिक महानगरपालिका १००४, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १०६,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७६, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. १९१, गृह विलगीकरण ८१ असे एकूण १ हजार ५३६  कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.तसेच जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ११४  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

*आज दाखल रुग्ण :*

आज जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रूग्णालय १० , नाशिक महानगरपालिका १८२,
 डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ०७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र १२, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. , सी.सी.सी. ९८  व गृह विलगीकरण ०० असे एकूण ३०९  संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:*

नाशिक ग्रामीण मधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.७० टक्के, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४४.७६, मालेगाव मनपा मधून ७९. ०५ टक्के व जिल्हा बाहेरील ६२.९० टक्के इतके असून संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.८८ टक्के इतकी आहे. 

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ४७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७५ व जिल्हा बाहेरील ११  अशा एकूण २३८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

*लक्षणीय :*

◼️४ हजार ११४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ३४० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ५३६ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️आजपर्यंत निगेटीव्ह अहवालांची संख्या १६ हजार ५६७.

*(वरील आकडेवारी आज रात्री. ८.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

           
Previous Post Next Post