YouTube Video Carousel

शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन : जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे

नाशिक दि. 30 जून 2020 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) :
कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांमध्ये पीक कर्ज मागणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  https://kcc.setuonline.com या  संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बळसाणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी व व्यापारी बँकांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी छापील अर्जाद्वारे बँकांकडे पीक कर्ज मागणी अर्ज केले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून त्यावर कर्ज सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही श्री. बलसाने यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post