पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील. याचसोबत प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे देण्यात येणार आहे. पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात अधिक काम होत असते. जुलैपासून हळूहळू सणाचे दिवस येतात.
संपूर्ण देशात एका रेशनकार्ड योजना लागू करणार
केंद्र सरकार आता संपूर्ण देशात एक रेशनकार्ड योजना लागू करणार आहे. या पुढे कोणताही व्यक्ती कोठूनही आपले रेशन प्राप्त करू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. गरीब, गरजवंतांना जर सरकार मोफत धान्य देत असेल, तर त्याचे श्रेय देशातील शेतकरी आणि प्रामाणिक करदात्याना जाते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात आपण वेळेत लॉकडाऊन सुरू केल्यामुळे आमची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. नियमांचे पालन केलेच पाहिजे. जे लोक नियमांचे पालन करत नाहीत त्यांनी टोकावे लागेल, रोखावे लागेल, असे मोदी म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे एका देशाच्या पंतप्रधानालाही दंड भरावा लागला आहे. भारतात देखील स्थानिक प्रशासनाने अशीच सतर्कतेने काम केले पाहिजे. हे १३० कोटी लोकांचे रक्षण करण्याचे अभियान आहे. भारतात संरपंच असो की देशाचा पंतप्रधान असो, कोणीही नियमांच्या वर नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वावलंबी भारतासाठी दिवसरात्र एक करू
देशातील १३० कोटी जनतेला एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर आपण स्वावलंबी भारत बनवू शकू. यासाठी आपणा सर्वांना एकत्र येत दिवसरात्र काम करावे लागणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
*सविस्तर बातमी वाचा मालेगाव लाईव्ह ॲपवर*
मालेगाव ॲप डाऊनलोड करण्यासाठी http://tiny.cc/Jayu / http://jay.enterprises या लिंक वर क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मालेगावातील बारीक-सारीक घडामोडींपासून ब्रेकिंग न्यूज पर्यंत निर्भीडपणे निष्पक्ष सडेतोड खात्रीशीर बातम्यांसाठी मालेगाव लाईव्ह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा