YouTube Video Carousel

आषाढी मंगळवार : सोशल डिस्टंसिंग चा फज्जा



मालेगावच्या लोकांना कोरोना ची भीती नाही?
मालेगाव शहरातील सोयगाव भागातील पारिजात कॉलनी जवळील प्रादेशिक भाषेत 'सौंदड' 'आई माऊली' नावाने प्रसिद्ध असलेल्या वृक्षाजवळ आषाढी महिन्याच्या मंगळवारी व शुक्रवारी स्त्रिया माहेरी येऊन वृक्षा जवळील पाषाण मूर्ती ला नैवेद्य ठेवून पूजा करीत असतात.
परंतु ही पूजा-अर्चना सद्यस्थितीत धोकेदायक तर   ठरणार नाही ना?
एकीकडे शासन वारंवार विनवण्या करीत असते की नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, मालेगावात जरी कोरोनाची भीती मावळताना दिसत असली तरी, धोका मात्र पूर्णपणे टळला नाही.
 लोकांच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे मालेगावात पुन्हा करोना मुसंडी मारण्याची शक्यता आहे, 
याठिकाणी पोलिसांतर्फे एकदा सूचना देऊनही पोलीस गाडी गेल्यानंतर थोड्यावेळात तिथे पुन्हा गर्दी झाली होती, नागरिकांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य प्रकारचे काळजी घेऊन, सोशल डिस्टंसिंग चे पालन करून पूजा-अर्चना करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post