YouTube Video Carousel

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे


कोरोनासोबत राहायला शिका याचा अर्थच हा आहे की यावर सध्या काहीही औषध नाही आणि ट्रिटमेंट नाही. त्यामुळे जग थांबू शकणार नाही. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकालं पहिजे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आपल्याला कामकाज सुरु करावं लागेल. त्यासाठी काही नियम असतील त्या नियमांनुसार आपल्याला जावं लागेल, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
http://bit.ly/MalegaonLive15
रेड झोनमध्ये आहे ती परिस्थिती मेन्टेन करण्याचं काम आजच्या घडीला केलं आहे. रेड झोनमध्ये बदल इतकाच करण्यात आला आहे की रेस्टॉरंटमधून टेक होम फूड घेऊन जाऊ शकता. इंडस्ट्रीज या ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलंय.

दरम्यान, नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बस सुरु व्हायला हरकत नाही. संध्याकाळी 7 सकाळी 7 पर्यंत मात्र बंद पाळण्यात येणार आहे. दुकानं उघडतील मात्र त्यांच्या वेळा असतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
Previous Post Next Post