*मालेगाव शहरात पुढील आदेशापावेतो संचारबंदी कायम : उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा*
*अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे*
‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात सोमवार 18 मे 2020 रोजीच्या सकाळी 07:00 वाजेपासून पुढील आदेशापावेतो संचारबंदी कायम करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने नागरिकांनी घरात थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मालेगाव शहरात आतापर्यंत 619 ‘कोरोना’ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांपासून मालेगाव शहरातील इतर नागरिकांच्या जिवितास कोरोना (कोविड-19) या आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगाव शहरात पुर्णत: संचारबंदी करणे अनिवार्य आहे. तसेच अपर पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे.
या पार्श्वभूमीवर दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार *संपूर्ण मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर,*
*सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर* *गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे,* *फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे,* *रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश काढला आहे*. *यात अत्यावश्यक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील*,
आयुक्त महानगरपालिका, मालेगाव यांनी *कन्टेमेंट परिक्षेत्र म्हणुन प्रतिबंधीत केलेले भाग वगळता उर्वरित भागाकरिता या आदेशातून खालील आस्थापना, दुकाने यांना वगळण्यात येत असल्याचेही त्यांनी कळविले आहे.*
यात प्रामुख्याने
🟢 मेडीकल्स
🟢रुग्णालये,
🟢दुध व दुग्धोपादने पुरवठा करणारे विक्रेते,
🟢 गॅस एजन्सीज
🟢चारा विक्रेते,
🟢किराणा दुकाने
*यांना सकाळी 07:00 ते दुपारी 2:00 व सायंकाळी 5.00 ते 08.00 वाजेपावेतो सुट राहील*.
*केवळ हातगाडीवरून फळांची विक्री करणारे विक्रेते सकाळी 07.00 ते 02.00 यावेळेत फळांची विक्री करु शकतात.*
तसेच केवळ पोलिस विभाग, महसुल विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभागासह इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर व त्यांच्या आस्थापनेवरील स्टाफ यांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यासाठी निर्धारित केलेल्या पोलिस दक्षता पेट्रोलपंप, रावळगांव नाका, मालेगाव कॅम्प ;
मुतल्लिक पेट्रोलपंप, दरेगांव,
बालाजी पेट्रोलपंप, सोयगांव,
उदयराज ऑटोमोबाईल, पेट्रोलपंप, मालेगाव कॅम्प;
नॅशनल पेट्रोलपंप, दरेगाव रोड, मालेगाव;
एम.जी.पेट्रोलपंप, नवीन तहसिलच्या पाठीमागे, मालेगाव ;
http://bit.ly/MalegaonLive15
ए.आर.पेट्रोलपंप, स्टार हॉटेल शेजारी, मालेगाव हे सात पेट्रोलपंप सकाळी 07:00 ते दुपारी 02:00 वाजेपावेतो सुरू राहतील.
तर शहरी हद्दीपासून 2 किलोमीटर परिघातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद राहतील.
त्याच प्रमाणे मालेगाव शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंन्टेन्मेंट एरिया) वगळता इतर भागातील सर्व बँका सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत संचारबंदीच्या आदेशातुन वगळण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधीत आपत्ती निवारण व्यवस्थापन (महसूल विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी) यांना यातून वगळण्यात आले आहे, मात्र त्यांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
मालेगाव लाईव्ह