( मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि विकास समिती आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विशेष दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी मालेगावातील सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉ. भुषण पाटील यांच्या *डेन्टेक डेंटल केअर युनिट* चे सहकार्य लाभले. सदर शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा सत्तार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सुरक्षा आणि विकास समितीच्या समन्वयक प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी केले त्यांनी या शिबिर आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला. डॉ. भूषण पाटील यांनी विद्यार्थिनींच्या दंतशल्याची मोफत तपासणी केली, आणि विद्यार्थिनींना व्यक्तिगत सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थिनींना विविध दंत रोग आणि त्यावरील उपाय याविषयी विशेष मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ लोधी कनीझ फातिमा, डॉ. ताहेरा तस्निम यांच्यासह अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या सदर शिबिराचा लाभ विद्यार्थिनी तसेच उपस्थित प्राध्यापक वर्गाने घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सबाहतुन्निसा हिने केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कु उम्मे अम्मारा, कु शगुफा, कु इफरा, कु आफीया यांनी परिश्रम घेतले. प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी आभार मानल्यावर शिबिराची सांगता झाली