YouTube Video Carousel

मालेगाव तालुका गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय मगर व उपाध्यक्षपदी राजेश धनवट व नितीन पवार यांची निवड

मालेगाव तालुका गणित विज्ञान शिक्षकांच्या सहविचार सभेत नाशिक जिल्हा गणित अध्यापक मंडळ सलग्न, मालेगाव तालुका गणित अध्यापक संघाची निवड करण्यात आली. नासिक जिल्हा गणित अध्यापक संघाचे सचिव प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा गणित अध्यापक संघाची पुनर्रचना करण्यात येऊन मालेगाव तालुका गणित अध्यापक संघाची प्रथम कार्यकारिणी करण्यात आली आहे. 
       संघाच्या अध्यक्षपदी, गुरुवर्य दादासाहेब बोवा शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचलित, तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय सायने येथील अनुभवी गणित विज्ञान शिक्षक संजय विजयसिंग मगर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के. बी.एच. विद्यालय मालेगाव कॅम्प येथील राजेश धनवट व शिरसोंडी येथील नितीन पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच सर्व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार जिल्हा गणित अध्यापक संघाचे सचिव प्रशांत पाटील व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजन चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला
     नवनिर्वाचित कार्यकारिणी
अध्यक्ष-संजय विजयसिंग मगर (सायने)
उपाध्यक्ष-राजेश धनवट (मालेगाव) व नितिन पवार (सिरसोंडी)
कार्याध्यक्ष- अभय देशमुख (पाडळदे )व श्रीमती स्वाती दाते (मालेगाव)
कोषाध्यक्ष- नीलिमा सोनार( टिंगरी)
परीक्षा प्रमुख-योगेंद्रसिंग ठोके (मालेगाव)
सहसचिव-सौ वैशाली महाजन (मालेगाव )व प्रशांत पाटील (कुकाने)
प्रसिद्धी प्रमुख-संदीप किसन देवरे नवभारत मालेगाव व सचिन बोरसे चिखलओहळ
सदस्य-विवेक हिरे , रवींद्र महाले, जितेंद्र शिरुडे अमित सरक, प्रशांत पवार,राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली.
 नवनिर्वाचित अध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष डी. डी. वाणी व पदाधिकारी, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, मालेगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post