YouTube Video Carousel

जे ए टी महिला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

( मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध विभागांनी यानिमित्त निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इंग्रजी विभागातर्फे विद्यार्थिनींनी स्वरचित कविता म्हणून आणि मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी हारूण मोहम्मद रमजान यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेश्रामकर सुनेत्रा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षण हे वर्गाच्या चार भिंती पलीकडे देखील आहे आणि सतत जिज्ञासू राहून ज्ञानाचा वापर सुजाण नागरिक बनण्यासाठी करावा असे आवाहन केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. यामध्ये विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. प्रा. मुनव्वर अहमद यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कु. शगुफा, कु. सादेका, कु. नसिमुस्सहर यांनी स्वरचित कविता सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबाहतुन्निसा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. उम्मे अम्मारा, कु. सबा, कु. शबाना इ. नी प्रयत्न केले.

Previous Post Next Post