(मालेगाव) येथील जे ए टी कला, विज्ञान, आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात कल्चरल फर्स्ट 2023 24 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी मधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. *कारवा* या थीम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवलचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी स्वागत पर भाषण केले. सदर फेस्टिवलच्या समन्वयक डॉ. लोधी कनीझ फातिमा यांनी सदर फेस्टिवलची उद्दिष्टे कथन केली. सांस्कृतिक महोत्सव समन्वयक प्रा मेश्रामकर सुनेत्रा यांनी सदर फेस्टिवल अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची माहिती दिली. या कल्चरल फेस्टिवल मध्ये मेहंदी स्पर्धा (प्रमुख डॉ. खान रुमाना) रांगोळी स्पर्धा (प्रमुख डॉ हुमायरा, प्रा.सफिया, गीत गायन स्पर्धा (प्रमुख डॉ. ताहेरा तस्निम, गझल स्पर्धा ( प्रमुख डॉ फहमीदा अन्सारी) देशभक्ती गीत गायन स्पर्धा (डॉ. सलमा अब्दुल सत्तार, डॉ.लोधी कनीझ फातमा) वेशभूषा स्पर्धा ( प्रमुख प्रा मेश्रामकर सुनेत्रा) टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा (प्रमुख प्रा विनोद कुमार पवार, डॉ डी डी सावंत, प्रकल्प स्पर्धा ( प्रमुख प्रा मोहसीन पठाण), फुलांची सजावट स्पर्धा, फळे नक्षीकाम स्पर्धा (प्रमुख डॉ याहया खान पठाण, स्व संरक्षण प्रात्यक्षिक ( प्रमुख डॉ सलमा अब्दुल सत्तार, डॉ लोधी कनीझ फातिमा) वन मिनिट गेम ( प्रमुख डॉ फरझाना) इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, परीक्षक म्हणून प्रा अबुलैस निहाल अहमद, प्रा. पवार विनोद कुमार प्रा वैशाली शेलार, डॉ महेजबीन, मिसेस फहमीदा लतीफ,डॉ मोहम्मद इस्माईल, डॉ सादिया, मिसेस शुमाघला वकील अहमद, मिसेस तबस्सुम, इत्यादींनी परीक्षक म्हणून काम पाहिले या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी हिरवीने भाग घेऊन आपले कलागुण प्रगट केले. या विविध स्पर्धांमध्ये पाचशे पंचेचाळीस हून अधिक विद्यार्थ्यांनीनी भाग घेतला.l व्यवस्थापन समितीकडून सर्व आयोजकांचे कौतुक करण्यात आले. सदर फेस्टिवलच्या यशस्वीतेसाठी डॉ अताउर रहमान नुरी, प्रा अन्सारी, डॉ रुबीना अब्दुल सत्तार प्रा नाजनीन यांनी परिश्रम घेतले