YouTube Video Carousel

जे. ए. टी. महिला महाविद्यालयात मानवी मूल्ये यावर कार्यशाळा

(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी मूल्ये या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. आज अनैतिकता,अराजकता,आतंकवाद,अवैध धंदे,भ्रष्टाचार,बलात्कारासारख्या सामाजिक विकृती इ. चे पडसाद देशभर ऐकू येत आहेत. त्यांचे उच्चाटन होण्यासाठी मूल्यशिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आजच्या विद्यार्थिनी शैक्षणिक जीवनात वाटचाल करीत असताना त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य असावे आणि भावनिक ऐक्य सदैव राखले जावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत प्रथम सत्रात इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी *मूल्य शिक्षण- काळाची गरज* या विषयावर आपले विचार प्रकट केले कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा सत्तार यांनी *मूल्यशिक्षण आणि आजचे विद्यार्थी* यावर आपले विचार प्रकट केले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.लोधी कनीझ फातिमा यांनी *मूल्यशिक्षण आणि समाज* या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचा लाभ प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थिनींनी घेतला कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कु. अदिना , कु.आफिया कौसर, कु. हुस्ना कौसर, कु. हेरा तेहरीम, कु. शमामा , कु. सुमय्या, कु. स्वालेहा फैजी, कु. जवेरीया इ. विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सबाहतुन्निसा हिने केले. प्रा. नाझनीन यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली
Previous Post Next Post