YouTube Video Carousel

उद्यापासून लॉकडाउन /कडक निर्बंध हटणार?

राज्यातील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. 'ब्रेक द चेन' या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध हे 15 जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र आता पाच टप्प्यानुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिविटीची अट घालण्यात आली आहे. पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाईड आहेत अशा संपूर्ण जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १८ जिल्हे आहेत. यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. अंमलबजावणी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतील. तसेच दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं
Previous Post Next Post