YouTube Video Carousel

RTPCR टेस्ट करत असताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला चोप

विरार पूर्वमध्ये हि घटना घडली आहे. येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची RTPCR टेस्ट करत असताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला चांगलंच चोपले आहे.

विरार पूर्वे मध्ये बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली COVID चाचणी करण्यासाठी गेली होती. दरम्यान, चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली.

या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक केलेली नसल्याची माहिती विरार गुन्हे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली


Previous Post Next Post