YouTube Video Carousel

जर्मनीकडून चार लाख लिटर उत्पादन क्षमता असलेला ऑक्सिजन निर्मिती प्लांट भेट

दिल्लीः जर्मनीने 4,00,000 लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांट पाठविला आहे. हा प्रकल्प डीआरडीओ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयात सेवा देईल. आज भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी आज या प्लांट चे निरीक्षण केले.
कोरोना संकटाच्या वेळी भारताने जगाला बरेच काही दिले. म्हणून ही मदत परत करणं हे कर्तव्य आहे. जेव्हा आम्हाला हे कळले की भारताला  ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तेव्हा आमचे अधिकारी या लढ्यात उतरले आहे आणि त्यांनी मोठे ऑक्सिजन प्लांट आणले : जर्मन दूत
Previous Post Next Post