YouTube Video Carousel

*कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा :तालुका कृषी अधिकारी व्यवहारे*

मालेगाव, दि. 24 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)*: शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टल या एकात्मिक प्रणालीवर एकाच अर्जाद्वारे विविध घटकांसाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष अनुदान लाभाची रक्कम डीबीटी द्वारे अर्जदाराच्या बँक खात्यावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक शेतकरी बांधवांनी कृषी यांत्रिकीकरणातंर्गत शेतकरी गटाद्वारे भाडे तत्वावरील अवजारे बँक, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पल्टीनांगर, मळणीयंत्र, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर. तर सिंचन सुविधा अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन, वैयक्तीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पीव्हीसी पाईप, विद्युत पंपसंच. तसेच फलोत्पादन घटकातंर्गत कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, मल्चिंग, मधुमक्षिका पालन, आळिंबी उत्पादन, फळबाग लागवड या घटकांचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या महा-ई-सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन https://mahadbtmahait.gov.in
 या संकेतस्थळावर आपल्या आधार क्रमांकाद्वारे नावनोंदणी करुन लाभ घ्यावयाच्या घटकासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले आहे.

Previous Post Next Post