YouTube Video Carousel

वादळी वाऱ्यामुळे एकता हॉटेल जमीनदोस्त,२ जखमी!

  मालेगाव  (सचिन पगारे ) मालेगाव शहाराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरील एकता हॉटेल वादळी वाऱ्यामुळे कोसळून 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, दुपारी झालेल्या वादळी पावसात हॉटेलचा समोरील भाग कोसळून दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे, आणखी कोणी जखमी झाला आहे का याबाबत तपास सुरू आहे
 सदर ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, 
Previous Post Next Post