YouTube Video Carousel

बेरोजगार भत्ता योजनेचा मेसेज खोटा

सध्या व्हाट्सअप वर प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 चा रजिस्ट्रेशन चा मेसेज व्हायरल होत आहे, या मध्ये ब्लॉगस्पॉट ची लिंक देऊन आपली वैयक्तिक माहिती भरण्यासाठी सांगितले आहे, काही लोक  हा ही मेसेज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बेसुमार पोस्ट करत सुटले आहेत, अशा प्रकारची शासनाची कोणतीही योजना नसून असल्यास त्याचे रजिस्ट्रेशन हे कुठल्याही ब्लॉगस्पॉट च्या लींकवर होत नसते, त्यामुळे अशा कुठलाही मेसेज वर भरवसा न ठेवता त्वरित डिलीट करावा व इतर ग्रुप मध्ये टाकू नये.
अशा प्रकारचे आपली वैयक्तिक माहिती गोळा करून सदर हॅकर्स हे लुबाडणारे कंपन्यांना विकत असतात त्यामुळे आपली फसगत होऊन मोठे आर्थिक नुकसान व मानसिक त्रागा होण्याची शक्‍यता बळावते त्यामुळे अशा मेसेजेस पासून दूर राहिलेलेच बरे.
आपल्याकडेही अशा काही मेसेज आले तर मालेगाव लाईव्ह ला पाठवा आम्ही त्याची शहानिशा करून आपल्याला माहिती देऊ

Previous Post Next Post