YouTube Video Carousel

शहरातील रेमडेसिविर चा पुरवठा करणाऱ्या मेडिकल्सची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी

आज मालेगाव शहरातील रेमडेसिविर चा पुरवठा करणाऱ्या खालील प्रमुख मेडिकल ची उपविभागीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
-अशोका मेडिकल 
-दीपक मेडिकल 
-सायली मेडिकल 
-सोहम मेडिकल
 -सिक्स सिगमा मेडिकल  
       सदरचा तपासणी मध्ये आढळून आलेल्या त्रुटी खालील प्रमाणे आहेत.
1. -सिक्स सिग्मा मेडिकल मध्ये ज्या रुग्णांना रेमडेसिविर चे वाटप करण्यात आले त्यातील काही रुग्णांचा  HRCT /RTPCR रिपोर्ट फाईल मध्ये आढळून आला नाही.
- व्हाट्सअप ग्रुप वर स्टॉक 40 दाखवलेला असताना प्रत्यक्षात मात्र 120 vials आढळून आल्या. सदरचा स्टॉक आजच प्राप्त झाला असे तपासणी वेळी सांगण्यात आले मात्र बिलाची तपासणी केली असता सदर औषधाचे बिल 5 तारखेचे आढळून आले.
2. दिपक मेडिकल मध्ये FDA मार्फत सवलतीच्या दरात पुरविण्यात आलेले
रेमडेसिविर एक हजार दोनशे रुपयांना विकणे अभिप्रेत असताना 4800/- रुपयांचे बिल आढळून आले. 1200/- रुपयात रेमडेसिविर दिले आहे मात्र बिल 4800/- रुपयांचे दिल्याचा युक्तीवाद केमिस्ट करत आहे.
3. सायली मेडिकल मध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व आधार कार्ड घेऊन रेमडेसिविर दिल्याचे दिसून येत आहे.
याबाबत विचारणा केली असता HRCT चे रिपोर्ट असल्याचे व ते इतर फाईलमध्ये असल्याचा युक्तिवाद केमिस्ट करीत आहे. उद्या त्यांना सदरचे रिपोर्ट सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
-अशोका मेडिकल मध्ये नमुनादाखल तपासणी केलेल्या दहा बिलामध्ये दोन बिलांमध्ये HRCT /RTPCR रिपोर्ट आढळून आला नाही. सदरच्या रुग्णाने दुसऱ्यांदा रेमडेसिविर विकत घेतल्याचे ते बिल असल्याचे व पहिल्या वेळेस विकत घेताना रिपोर्ट दिला असल्याचे व शोधून सादर करणार असल्याचा युक्तिवाद केमिस्ट ने केला आहे.
तथापि त्यांना नोटीसा काढून खुलासा मागविण्याबाबत SDO Malegaon यांना  सूचित करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार दिसून आले तर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत यापुढे फौजदारी कारवाई संबंधितांविरुद्ध करणेत येईल. या कठीण प्रसंगी सर्व व्यावसायिकांनी नागरिकांच्या हितार्थ काम करणे आवश्यक असल्याचेही आवाहन आहे.
- सूरज मांढरे 
जिल्हाधिकारी नाशिक
Previous Post Next Post