YouTube Video Carousel

चांदवडला नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटरला भीषण आग

चांदवडला नव्यानेच सुरू झालेल्या कोविड सेंटर बिल्डिंगला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे समजते. याठिकाणी सेंटरच्या खाली फर्निचरचे भले मोठे गोडावून तसेच येथील रन वे हॉटेल ला देखील या आगीचा विळखा पडला आहे. हे खाजगी कोविड सेंटर असून घटनास्थळी मालेगाव, पिंपळगाव , चांदवड अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या खाजगी कोविड सेंटरचे आजच उदघाटन होते. अशातच ही भीषण आग लागलीय , सुदैवाने जीवितहानी होण्याची अद्याप पावेतो कोणतीही माहिती नाही.
Previous Post Next Post