युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांना निवृत्तीवेतनासाठी आवाहन
नाशिक दि. 06 एप्रिल, 2021 (जिमाका वृत्तसेवा):
जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांनी भारत चीन व भारत पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, परंतु कोणत्याही प्रकाराचे निवृत्तीवेतन ते घेत नसतील अशा माजी सैनिकांनी निवृत्तीवेतनासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत कागदपत्रे जिल्हा सैनिक कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, सन 1962, 1965 व 1971 भारत चीन व भारत पाकिस्तान च्या युध्दात ज्या माजी सैनिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, तसेच ज्या सैनिकांना LADAKH-1962, CLASP/NEFA 1962.CLASP, रक्षा पदक, समर सेवा स्टार किंवा संग्राम पदक यापैकी कोणतेही युध्द पदक प्राप्त आहे, अशा माजी सैनिकांनी आपली कागदपत्रे जिल्हा सैनिक कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावीत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. कापले यांनी कळविले आहे.
0000000
माजी सैनिकांना कुटूंब निवृत्तीवेतन नाव नोंदणीसाठी आवाहन
जिल्ह्यातील 1986 पूर्वी सेवतून निवृत्त झालेले माजी सैनिक जे निवृत्तीवेतनधारक आहेत, तसेच कुटूंब निवृत्तीवेतनसाठी ज्या माजी सैनिकांनी आपल्या पत्नीचे नाव नोंदविले नसेल अशा माजी सैनिकांनी लवकरात लवकर जिल्हा सैनिक कार्यालयात संपर्क साधून, नावनोंदणी करावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.