दिनेश पगारे - नाशिक जिल्हा व बागलाण तालुका निसर्ग मित्र समिती यांच्या मार्फत *कोरोना योद्धा* म्हणून पोलीस, महसूल, पत्रकार, शिक्षक ह्यांनी कोरोना या राष्ट्रीय महामारीत आपल्या परिसरात , विभागात सामाजिक बांधिलकी जोपासुन , आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र जनसेवा केली या सामाजिक कार्याची दखल घेवुन निसर्ग मित्र समिती तर्फे कोरोना योध्दा म्हणुन सन्मानीत करण्यात आले ...ह्या कार्यक्रमात महाराष्ट्र गौरव व महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त पोलीस कॉन्स्टेबल रविराज बच्छाव, ग्रामसेवक पंकज पवार, तलाठी जयप्रकाश सोनवणे यांचे कार्य अतिशय मौलीक व अतूलनिय आहे असे समिती चे अध्यक्ष प्रेमकुमारजी अहिरे यांनी बोलून दाखविले कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष मा. प्रेमकुमारजी आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष मा. भाऊसाहेब आहिरे,जिल्हा उपअध्यक्ष सुनील कापडणीस सर तालुकाध्यक्ष मा. राठोड सर आदि उपस्थित मान्यवर हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला सूत्र संचालन शिंदे सर यांनी केले प्रस्तावना दादाजी अहिरे आणि आभार राठोड सर यांनी केले.
