YouTube Video Carousel

मालेगाव तालुक्यात पुन्हा कोरोना चा कहर, दाभाडी रावळगाव अस्ताने लखाने कळवाडी डोंगराळे भागात जबरदस्त रुग्ण वाढ

मालेगाव पॅटर्नचा बार फुसकाच,
मालेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसात जबरदस्त कोरोना रुग्ण वाढ झाली असून ग्रामीण भागात करणे आपले बस्तान मांडले आहे, 
नाशिक पाठोपाठ आता मालेगाव तालुक्यात ही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ही बाब चिंता वाढवणारी आहे..
मालेगाव तालुक्यातल्या दाभाडी रावळगाव कळवाडी अस्ताने लखानी डोंगराळे आदी गावांमध्ये पुन्हा मोठ्या संख्येत रुग्ण वाढ झाली असल्याने परिसरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून अन्यथा रुग्णसंख्या ही अत्याधिक वेगाने वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे...
संपूर्ण जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या 603 असून तालुक्यातील रुग्णांची संख्याही चाळीसच्या वर आहे...

Previous Post Next Post