मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांमध्ये मालेगाव पॅटर्नचा गाजावाजा झाल्यामुळे मनातली भीती कमी झाली होती परंतु त्याचा परिणाम म्हणजे काहीच नाही असा होत गेला त्यामुळे दुर्लक्ष किंवा निर्धास्तपणे किंवा अति आत्मविश्वास त्यामुळे गेल्या या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मालेगाव तालुक्यात सर्वत्र आढळून आले, तालुका वासियांचे कोरोना बद्दलचे मत सध्या संभ्रमावस्थेत आहे, काही लोक करूनच संबंधित सर्व नियमांचे पालन करून आपले रोजचे व्यवहार चालू ठेवतात तर काही लोक मुद्दाम हून म्हणजे काहीच नाही अशा अविर्भावात वागत आहेत परिणामी अशा निष्काळजी लोकांमुळेच मालेगाव पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत,
सायंकाळी सात नंतर जरी संचार बंदी घालण्यात आली आहे, तरी हौसे नवशे सायंकाळी फेरफटका मारण्याच्या नादात मुद्दाम हून फिरताना दिसत आहेत.
आज मालेगाव सुमारे 84 जन करून पॉझिटिव आढळून आले कुठल्या एरियात आले आहे ही लिस्ट बघा