YouTube Video Carousel

नांदगाव वाखारीत आई-बापासह 2 लेकरांचा निर्घृणपणे खून

(मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)नांदगाव तालुक्यातील वाखारीत जेऊर रस्त्याजवळ शेतात रहाणाऱ्या एकाच कुटुंबातील पती पत्नी व त्यांच्या दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या झाल्याने सर्वत्र घबराट उडाली आहे.

वाखारी येथील शेतकरी तथा रिक्षाचालक  समाधान आण्णा चव्हाण( वय ३७) भरताबाई चव्हाण (वय ३२) गणेश (वय ६)आरोही (वय ४) अशा या एकाच कुटुंबातील चौघांची  हत्या करण्यात आली आहे, या हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे मालेगाव पोलिसांचे हाती देण्यात आली आहेत, नाशिक नही श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

समाधान यांच्या घराजवळ असलेल्या जेऊर येथील मधुकर सांगळे यांच्याकडे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू रिक्षा नेली होती त्यातील काही कांदे भरून झाले होते घरी आले आजचे बाकीचे काम पूर्ण करायचे होते त्यासाठी सांगळे रिक्षा चालक समाधान याला पहाटे पाच वाजल्यापासून  फोन करीत होते मात्र समाधान फोन उचलत नसल्याने सकाळी सांगळे समाधान यांच्या वस्तीवरील घरी आले आणि समोरचे दृश्य बघून ते घाबरले कारण घराच्या ओसरीवर रक्तबंबाळ अवस्थेत सगळेच कुटुंब निपचित पडलेले  निदर्शनास आले. सांगळे यांनी त्वरित जेऊर गाठून सरपंच व पोलीस पाटलांना माहिती दिली व त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
हे सर्व घराच्या ओसरीवर झोपलेले होते अज्ञात मारेकऱ्यांनी ह्या गरीब कुटूंबाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत..

Previous Post Next Post