YouTube Video Carousel

शिक्षक भारतीचे ३ जुलै 2020 रोजी एक दिवसाचे आंदोलन, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..

मालेगाव : दिनेश पगारे
         शिक्षक भारती ही राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची शासन मान्यता प्राप्त संघटना आहे. राज्य शासकीय निमशासकिय कर्मचारी संघटना समन्वय समितीची सदस्य आहे. समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी  आंदोलनात शिक्षक भारती संघटना सहभागी  होत आहे. या आंदोलनात शिक्षक भारती संघटना राज्यातील सर्व  शिक्षणउपसंचालक,शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन देत आहेत. तरी आमच्या मागण्यांचा योग्य   विचार होऊन महाशय आमचे निवेदन शासनाकडे आपणामार्फत पोहच करावे ही विनंती.  

आंदोलनातील मागण्या - चे निवेदन  जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
१) कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करा.
२) ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करा.
३) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्या. (टॅबलेट, ऍन्ड्रॉइड फोन)
४) विनाअनुदानित व रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्या.
५) कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्या.
६) कोविड ड्युटीवर कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्या.
७) कोविड ड्युटी करणाऱया सर्व शिक्षक शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करा.
८) कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घ्या.
९) कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांना प्रोत्साहन भत्ता द्या व विशेष वेतनवाढ लागू करा.
१०) शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्या. 
११) शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सँनिटायझेशन करा. शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी  सर्व साहित्य उपलब्ध करून द्या.
१२) कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अॅक्टिव्हिटी बुक द्या.
१३) कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील  शाळेत विनाअट  प्रवेश द्या.
१४) कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नका.
१५) मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका.

यावेळी भारत शेलार राज्य सरचिटणीस, राजेंद्र लोंढे, नाशिक विभागीय अध्यक्ष ,के  के अहिरे जिल्हाध्यक्ष, नासिक,जयवंत भाबड, व्ही के मोहिते, ए डी काळे, सी बी पवार, ए डी मोरे, व्ही के सोनवणे, गोरख कुनगर,एन डी सुर्यवंशी, सुनील बर्वे, टी एम जाधव,डी पी झेटे, एस एल सोनवणे, नरेंद्र माळवे, अशोक बच्छाव, डी एस अहिरे,  कैलास सोनवणे, एस एस भालेराव,,बी डी गांगुर्डे,एस डी अहिरे, ताराचंद मेंटकर,   चंद्रशेखर शेलार , प्रशांत पाटील, सुवर्णसिंग ठोके, सुधीर पाटील, प्रशांत पवार, बाजीराव कदम, किशोर पाटील,  वाल्मीक घरटे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पगार विभागीय कार्याध्यक्ष विष्णू घुमारे तालुका कोषाध्यक्ष पिटी वाघ सर किशोर सोनजे संजयआदी  उपस्थित होते.
Previous Post Next Post